IT मधल्या तान्ह्या बालान्कारीता मनाचे श्लोक
प्रभाते मनी रोज चिंतीत JAVA
J2EE चा ही सदा ध्यास घ्यावा
घेवोनी जरा आसरा OSF चा
Reusable portlets develop कराव्या
Google सारखे पूर्ण साम्राज्य ज्याचे
तिथे काम करणे अहोभाग्य माझे
म्हणोनी सदा मागतो मी भिकारी
मिळे job ऐसा जो आयुष्य तारी
For testers-
सदा सर्वदा Code तुझा पडावा
तुझे कारणी रेट माझा चढावा
उपेक्षु नको काही खंत व चिंता
defect सापडो मागणे हेची आता
नको रे मना क्रोध हा manager चा
नको रे मना खेद हा Appraisal चा
म्हणे चक्रधारी फुटे कर्म त्याचे
परी जो सदा ह्याच तालात नाचे
मना सज्जना net शोधीत जावे
मिळे code तो फक्त टाकीत जावे
मना सर्वथा code पाहुनी घ्यावा
परी या जगी तो चि publish करावा
जय जय James Gosling समर्थ!!!!
BY : Kartik Kulkarni

