'सांस्कृतिक राजधानी' - पुणे '
नमस्कार मित्रानो,
टाइटल वरून एकदम घाबरू नका, मी निबंध नाही लिहित आहे, तर माझा या शहरातील अनुभव माझ्या शब्दात सांगायचा एक छोटा प्रयत्न. खर तर यांवर महान दिग्गज पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या 'नागपुरकर पुणेकर मुम्बईकर' या विनोदी लेखात आपल्याच भावना सांगितल्या आहेत, पण म्हणतात ना "जावे त्याच्या वंशा" तसाच काही झाले अणि पुणेकर झाल्याशिवाय पुण्याची ओळख पटत नाही हेच खरे. मी पण 'wake up sid' मधील आयशा सारखी मनात छोट स्वप्न घेउन पुणे नगरीत प्रवेश केला. आणि 'new gal in pune city' झाली. पण या शहराच्या प्रेमात पडायला मला sid ची गरज नाही पडली अणि कोणी sid मिळाला पण नाही बर का !;) .पण खरच स्वप्न पूर्ण होणे न होणे, त्याचा आनंद दुःख हे सगळ एकीकडे, पण या शहरानी दिलेला प्रेम, आपुलकी, शिकवण हे सगळ अतुलनीय आहे. पुणे-पुणे एकल खुप होत, कारण नोकरी म्हणा की शिक्षण म्हणा, जो तो पुण्याला गेला अस आपण ऐकत असतो. पण खरच आहे की ते, पुणे आहेच मुळी पूर्वेचे ऑक्सफोर्ड. पण हे पण तितकेच खरे की जेव्हा एक वैधर्भीय पुण्यात जातो तेव्हा मात्र पुणेकरच्या भुवया उंचावतात.
पुण्यातील गृहप्रवेश आम्ही कोथरूड मधून सुरु केला.हो, अगदी नामांकित भाग, पण नाव असे का ठेवले आहेत असा प्रश्न वारंवार पडतो. आणि त्यावर खूप गमती पण होतात. आमची मैत्रीण म्हणाली, कोथरूड ला राहता तर रूड होऊ नका, असं का तर कोथरूड मध्ये शेवटी रूड आहे ना (english RUDE). हाहाहा., खरच इथे रूड लोक राहायचे म्हणून याला कोथरूड हे नाव पडल काय असे एक ना अनेक तर्क आम्ही सगळे काढत बसलो. पण मित्रानो हे तरी साधं नाव, काही काही नावं तर विचारूच नका, हडपसर काय, भोसरी काय, मगरपट्टा काय, अरे काय हे पट्टा घातलेल्या मगरी असायच्या का तिथे ;). आणि कर्वे रोड वरील नळस्टोप, आम्ही तर अजूनही त्या स्टोप वर नळ शोधतो आहे. इथे नक्की नळाचा शोध लागला असावा. पण खरच एरियाचे नाव कितीहि रूड असले तरी लोकं तसे नाहीत. उलट पुणेकरांना एका वाक्यात सांगायचे झाले तर 'डोक्यावर बर्फ आणि जिभेवर गुळ' ठेऊन असणारे म्हणजे पुणेकर.अगदीच कोणाला रागवायचे असेल तरी मात्र गोड शब्दातच बोलतील. अशीच एक गम्मत म्हणजे, एक मुलगा सुसाट वेगाने कर्वे रोड वरून जात होता, एक वृद्ध गृहस्थ त्याला म्हणाले "तुम्ही कर्वेंचे सुपुत्र का? ", अरे काय हे, कळेल का त्याला काही, सरळ सरळ म्हणा न, "हा रस्ता तुझ्या बापाचा काय ते", पण पुणेकर ना ते. आमच्याही अपार्टमेंट मध्ये असेच शांत लोकं, जरा काही कोणाचा आवाज नाही, पण सकाळी येणारा दुधवाला जणू काही संपूर्ण पुण्याचीच शांतता भंग करायचा कि काय, असा दुध म्हणून ओरडायचा कि आम्ही म्हणायचो जर यांनी गायीसमोर 'दुध' असा ओरडला तर गाय नुसता दुधच की गोमुत्र शेण सगळच देऊन देईल.:D. म्हटलं हा नक्कीच पुणेकर नसावा.
आपलं घर सोडून, शहर सोडून नवीन जागी राहायचं म्हणजे पहिला विचार हा खाणे आणि नवीन जागी फिरायला माहिती नसलेले रस्ते असे प्रश्न पडतात. पण हे शहर या बाबतीत कधीच निराश करत नाही. बाकी कुठे नाही मिळणार इतके सुंदर चमचमीत खाद्यपदार्थ इथे मिळतात. अगदी एक एक गल्ली "खाऊ गल्ली" म्हणून प्रसिद्ध असते. आणि आज नक्की कुठे खायचा असा विचार आधीच घरी करावा लागतो. मग बेडेकर मिसळ पाव कि ,सुजाता मस्तानी कि, दक्षिण दावणगिरी लोणी डोसा, कि कॅड बी , कि चितळे बाकरवडी कि दुर्गाची कॉल्ड कॉफी. असे एक न अनेक मेनू तयार असतात. पण आता ज्यांच्या जीभेतच गोडी असते मग ते त्या पदार्थात का नाही, म्हणून सगळेच पदार्थ थोडे गोडच असतात. कदाचित खाण्यातला तिखट पणा माणसाला तिखट बनवेल असा काही विचार असावा म्हणायचा. पण खरच, असा खाऊ खात आणि MH-12 hya पी.एम.टी. व पी.सी.एम.टी च्या बसनी फिरत दिवस घालवणे म्हणजे पुण्याची खरी मजा घेणे होय.
एका पेक्षा एक पुणेकरांची ओळख होते ती त्या बस मध्ये. तेवढ्या कमी अंतराच्या प्रवासातसुद्धा लोकं किती तरी चर्चा करून जातात. एकदा असाच बसमधून भली गर्दी असताना जात होते, तेव्हा conductor दादा मागे होते, आणि म्हणून समोरचे लोकं पैसे मागे पास करून तिकीट मागवत होते.तर संपूर्ण भारतातल्या बस सेवा विषयावर चर्चा झाली. म्हणे दिल्ली तर बसून असतो आणि सगळे जाऊन तिकीट काढतात, मुंबई तर अगदी नावाप्रमाणे बेस्ट म्हणे, नागपूर काय तर ते तर एम.पी. तच आहे ,कोणी काही असू देत आमचा पुणंच छान. attitude हा त्यांच्या रक्तातच असतो म्हणायचा. अशीच बस मध्येच थांबली, आणि स्टोप यायचा होता, एका मुलीनी चढायचा प्रयत्न केला तर driver दादा नाही म्हणाले, लगेच ती मुलगी पुणेरी सुरात "यायचय कुणाला की तुमच्या बसमध्ये" म्हणून पुढे गेली. बापरे, खर तर 'की' या शब्दाचा खर महत्त्व पुण्यात आल्यावरच कळत. अशा या ना त्या गोष्टीनी तिथल्या मराठी अस्मितेचा खरा अर्थ लक्षात येतो.
पण खरच पुणे ही मराठी आणि महाराष्ट्राची पुण्य भूमीच होय. आणि महाराष्टाच आजोळ म्हणायला हरकत नाही, इथे कुठल्याही व्यक्तीला दादा, मामा, मावशी असाच संबोधतात. जणू काही आईच माहेरच आहे. म्हणायला भारतातील आठवी मेट्रो city आहे, म्हणजे ती तेवढीच आधुनिक आणि तेवढीच आपली पारंपारिक संस्कृती पण जपत आहे. खरच, म्हणजे घरातलं घरपण पण मिळत आणि मेट्रो तील lifestyle पण मिळते., एका मराठी माणसाला आणखी काय हवे. एकदा एका पारसी कुटुंबाशी भेट झाली, ते आम्ही पारसी पुणेकर असा म्हणत अस्खलित मराठी बोलत होते, जातींनी पारसी पण मनानी मराठी असलेल्या त्या लोकांना पाहून खरच मराठी असल्याचा खरा अभिमान वाटतो. आणि मराठीचं जन्मस्थान असलेल्या अशा या प्राचीन पवित्र संस्कृतीला आणि नवीन उगम पावणाऱ्या lifestyle ला सोबत घेऊन चालणाऱ्या 'पुण्य नगरीला' (पुणे) माझा शतशः प्रणाम !!
The article has been written by Radika Pandharipande - A true Nagpuri - on her experiences in the city of Pune.

